आमच्या विषयी
स्मिता बाग रिसॉर्ट मध्ये आपले स्वागत आहे
शहरी इमारतींपासून दूर, आपल्या आयुष्यातले काही क्षण आरामात खर्ची घालावेत आणि निसर्गाच्या सानिध्यात विसावा मिळावा, यासाठी स्मिता बाग रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी हजर आहे.स्मिता बाग रिसॉर्ट हे नेरळ जवळ मौजे – मालेगाव तर्फ वरेडी येथे वसलेले आहे . नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. येथील वातावरण अतिशय सुन्दर व निसर्गरम्य आहे. स्मिता बाग रिसॉर्ट च्या आजूबाजूचा परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे तसेच विविध निसर्गरम्य स्थळांनी नटलेला आहे.
स्मिता बाग रिसॉर्ट हा निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी खूप छान पर्याय आहे. इथे तुम्हाला शेती, सांस्कृतिक परंपरा व जीवनशैली चा अनुभव, तसेच योगा प्रशिक्षण , औषधी वनस्पतीची माहिती असे उपयुक्त अनुभव पण मिळतील. याशिवाय वेगवेगळे खेळ जसे क्रीडा -मलखांब , बॅटमिंटन यांचे आणि पोहण्याचे प्रशीक्षणाची सुवीधा इथे उपलब्ध आहे.
चहा – नाश्ता असो वा जेवण इथे खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे. प्रशस्त, आरामदायक आणि वातानुकूलित रूम उपलब्ध आहेत. स्मिता बाग मध्ये तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कितीही वेळ घालवू शकतात. तर आजच भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून मौजमजा करण्याचा मनमुराद आनंद लुटा..