नेरळ

नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. या छोट्या नॅरो गेज रेल्वे ट्रॅकचे निर्माण अब्दुल हुसैन आदमजी पीरबोय यांनी स्वखर्चाने केला, इ.स. १९०७ मध्ये या ट्रॅकवर पहीली छोटी रेल्वेगाडी धावली.
नेरळ जंक्शन हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून माथेरान ह्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या नेरळ−माथेरान रेल्वे ह्या नॅरो गेज रेल्वेमार्गाची सुरूवात देखील येथेच होते.
उपनगरी मार्गावरील मंद गतीच्या लोकल गाड्यांखेरीज डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस व सह्याद्री एक्सप्रेस ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील नेरळ येथे थांबतात.